आई, उदे गं अंबाबाई

शिक्षण विवेक    04-Oct-2022
Total Views |

aai ude ga ambabai 
 
उदे उदे गं अंबाबाई साऱ्या विश्वाची तू आई
तुझ्या चरणांची सेवा, साता जन्मांची पुण्याई
सगुण रूप आदिशक्ती तूच जगदंबा अंबाबाई
आदिशक्ती अंबाबाई तूच जगदंबा माझी आई ||धृ ||
 
आई, उदे गं अंबाबाई आई, उदे गं अंबाबाई 
भक्तांच्या हाकेला धावणारी तू गं माता
महिषासुरमर्दिनी तुझी विजयी महागाथा
तिमिराच्या पाशात दावते प्रकाश वाटा
तुला शरणागत आई त्रिभुवनांचा ‘माथा’
आई, तुझ्या महाशक्तीचं चैतन्य ठायी ठायी || १ ||
 
आई, उदे गं अंबाबाई आई, उदे गं अंबाबाई 
नवरात्री उत्सवी गजबजल्या दिशा दाही
तुझ्या दर्शनासाठी भक्त अनवाणी पायी
हृदयाची स्पंदने म्हणतात आई! अंबाबाई!
उदे, उदे गं अंबाबाई, आई, उदे गं अंबाबाई
तूच श्री गणेश, कार्तिकेय, दत्तात्रेयाची आई || २ ||
 
आई, उदे गं अंबाबाई आई, उदे गं अंबाबाई 
महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती स्वरूपिणी
तुझाच महिमा तुझीचं रूपे भक्तांच्या मनोमनी
ब्रह्म स्वरूपिणी, सप्तशृंगी, त्रिगुणात्मक तू देवी
तुळजापूरची भवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी
माहूरची रेणुका देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी ||३ ||
आई, उदे गं अंबाबाई आई, उदे गं अंबाबाई 
गीत: राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
डी.ई.एस.सेकंडरी शाळा, पुणे.