रम्य सकाळ

शिक्षण विवेक    17-Dec-2022
Total Views |

Early Morning 
 
वाहू लागला पहाटेचा गार वारा
जागा झाला आसमंत सारा
कुहूकुहू स्वर कोकिळेचे
कानाला वाटले मधूर
दूर झाला खिन्न अंधार
 
आता सरली रात
उगवली तेजोमयी पहाट
फिरत आहे प्रसन्नतेची वाट
गगनात रंगला सप्तरंगी थाट
 
आसमंतीच्या गर्भातून सूर्य वर आला
आता अरुणोदय झाला
आली फुलांवर फुलपाखरे
परत वाहू लागले झरे
 
ही आहे देणगी मिळालेली निसर्गातून
हे पाहून प्रसन्न झाले मन
या वेगळ्याच उत्साहात
झाली दिवसाची सुरुवात
 
- श्रावणी प्रशांत देशमुख, ७ वी,
शिशुविहार प्रा. शाळा, कर्वेनगर