प्रिय डायरी...

शिक्षण विवेक    19-Dec-2022
Total Views |

प्रिय डायरी...
 
कागदाच्या पानांनी बनली डायरी,
लिहिले त्यात खूप काही.
 
विचारांनी ती पूर्ण भरली
वर्गातील जणू प्रिय सखी,
 
शाईने लिहिलेले शब्द,
जणू की माझ्या भावनाच व्यक्त.
 
पडलेले डोळ्यातले अश्रू त्यात,
ठेवले जपून आठवणीच्या रूपात.
 
सुख दुखाचे सर्वच क्षण
सांभाळून ठेवते हर क्षण
 
अशी ही डायरी विलक्षण
उघडून पाहता डायरी
 
कागदावरील त्या आठवणी,
निघे डोळ्यातून पाणी
- श्रावणी सोळंके, 8 वी,
श्री सिद्धेश्‍वर मा.विदयालय, माजलगाव.