डिजिटल भारत

शिक्षण विवेक    05-Dec-2022
Total Views |

digital bharat 
 
‘‘मुक्त आमचे आकाश सारे,
झुलती हिरवी राने-वने,
स्वैर उडती पक्षी नभी,
आनंद आज उरी नांदे’’
 
असे म्हणत भारत देश गुलामगिरीतून मुक्त होऊन प्रजासत्ताक झाला आणि त्याचबरोबर स्वतंत्रदेखील झाला. खर्‍या अर्थाने शूरवीर, स्वातंत्र्यवीर यांच्या पराक्रमाने देश स्वतंत्र होण्यास मदत झाली. त्यांच्यामुळे भारताचे, भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, आता एकविसाव्या शतकात पदार्पण करताना भारताने बरीच प्रगती साधली. उदा., माणसाची मंगळयान स्वारी किंवा अनेक नवे नवे उपग्रह अवकाशात पाठवणे. आताही ग्रहांवर मनुष्याला वास्तव्य करण्यासाठीची परिस्थिती कशी आहे, याविषयी जाणून घेणे सुरू आहे. हे सर्व काही प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश डिजिटल व्हावा; यासाठी प्रयत्न करून स्वप्न पाहिले. खरेतर डिजिटल भारत म्हणजे सरकारी विभाग आणि भारतीय जनतेला एकमेकांच्या जवळ आणण्याचा डिजिटल प्रयत्न आहे.
 
डिजिटल भारत ही सरकारची एक नवीन सुविधा आहे की, ज्याच्या मार्फत विविध सरकारी विभागांना थेट देशाच्या जनतेशी इंटनेटच्या माध्यमाने जोडता येईल. डिजिटल भारत या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश नवीन कल्पना आणि व्यावहारिक उपाय भारतीय जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देशामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रवाहाने सर्व नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या दृष्टीने डिजिटल सेवा, ज्ञान आणि माहिती यांची सुलभ उपलब्धता असणे, हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. डिजिटल भारत हा सरकारी विभाग आणि भारतीय जनता यांना एकमेंकाच्या सोबत आणण्यासाठीचा भारत सरकारचा उपक्रम आहे. या उपक्रमात डिजिटल पायाभूत सुविधा, डिजिटल साक्षरता, डिजिटल सेवा या बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे, अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 1 जुलै रोजी देशात ‘डिजिटल भारत’ अभिनयाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधून त्याचे उद्घाटन झाले.
 
रिलायन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्रीश विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी यांच्यासह अनेक उद्योगपतींनी डिजिटल क्रांतीचे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याविषयी आपली मते मांडली. अभिनयाबाबत जनजागृती करण्यासाठी देशाच्या 36 राज्यांत आणि 600 जिल्ह्यांत विविध कार्यक्रम घेण्यात आले या अभिनयामार्फत देशाला एक माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा सरकारचा प्रयास आहे. यामध्ये डिजिटल लॉकर, ई-एज्युकेशन, ई-हेल्थ, ई-साईन आणि नॅशनल स्कॉलरशीप पोर्टल यांसारख्या 1 लाख कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या योजना आहेत. ही मोहीम माहिती-तंत्रज्ञान व संवाद खाते यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. डिजिटल भारतासाठी काही खास अ‍ॅप्सचा वापर करण्यात येत आहे. उदा., मायगोव्ह मोबाईल अ‍ॅप, स्वच्छ भारत मिशन अ‍ॅप, आधार क्रमांक अपडेट अ‍ॅप इत्यादी.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच डिजिटल भारताच्या संदर्भात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथे, तसेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भेट दिली. त्या वेळेस झुकेरबर्ग यांनी आपला फेसबुक प्रोफाईल बदलून तिरंगा लावून मोदींच्या या कृतिशील उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले. या उपक्रमाचे अनेक फायदे आहेत; ते म्हणजे वेळेची बचत, कागदाचा कमी वापर, ई-क्रांती घडवणे, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात जास्तीजास्त विकास घडवून आणणे. ब्रॉडबॅण्ड महामार्ग तयार करणे इ.
 
‘‘आता उठवू सारे रान
आता पेटवू सारे रान
डिजिटल भारतासाठी
लावू पणाला प्राण’’
 
‘‘चला टाकू या एक पाऊल डिजिटल भारताकडे, ज्यामुळे होईल एक स्वप्न जगण्यापलीकडे. पुरोगामी भारत आता होईल आधुनिक, ज्यामुळे होईल विकासाची मर्यादा अगणित.’’
 
- रिद्धी श्रीकांत शिरोळे
१२ वी,