अंकनाद पाढे पाठांतराचे अॅप

शिक्षण विवेक    12-Feb-2022
Total Views |

Ankanad app 
कल्पना करा जर तुम्हाला साडे तीनचा पाढा आला किंवा सव्वाचा पाढा आला तर शाळेत तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करताच पण त्यासोबत पाव (पावकी), निम्मे (निमकी), पाऊण (पाऊणकी), सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी असे अपूर्णांकांचे पाढे पण आले तर गणित किती सोपं होईल.
तुम्ही म्हणाल हे पाढे पाठ करणं किती कठीण आहे? पण पाठ करायचेच नाहीत तर छान संगीत दिलेले हे नादमय पाढे फक्त ऐकायचे आणि आत्मसात करायचे आहेत. बरं याने फक्त गणितं लवकर सोडवता येतात असे नाही तर हे पाढे आत्मसात केल्याने तुमची तर्कसंगत विचार करण्याची (लॉजिकल थिंकिंग) क्षमता सुधारेल आणि गणित सोडून इतर विषयातही लक्षणीय प्रगती होईल. माहिती आहे न; गणित ही सर्व विज्ञान शाखांची जननी आहे.
गणिताच्या सात्मीकरण प्रणालीचे तीन टप्पे
टप्पा पहिला -
श्रवण संस्कार - सर्वप्रथम नादमय पूर्णांक आणि अपूर्णांकांचे पाढे मुलांनी आत्मसात करावे. पाढे आत्मसात झाल्याने गणितातील गुणाकार, भागाकार, वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ, अपूर्णांक आणि त्यावरील गणितीय क्रिया यामागील तर्कशास्त्र समजून घेणे सोपे जाईल..
अंकनाद मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून नादमय अंक उच्चार, पाढे 2 ते 10, पाढे 11 ते 20, पाढे 21 ते 30, पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (वर्ग) आणि इंग्लिश टेबल्स 1 to 100 spellings, 2 ते 10, 11 ते 20 आणि 21 ते 30 अशा एकूण 16 फाइल्स (मराठी 12 आणि इंग्लिश 4) यांचा समावेश आहे.
टप्पा दुसरा -
स्पर्धेचे आयोजन - प्रत्यक्ष पाढ्यांवर आधारित वयोगटानुसार स्पर्धा घेण्यात येतील.
टप्पा तिसरा -
गणितालय - वाढत्या इयत्तेनुसार कठीण होत जाणार्‍या गणितातील प्रक्रिया सुलभ करून गणितालय ह्या Interactive platform वरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. गणित म्हणजे केवळ आकडेमोड न राहता त्याचे सर्वस्पर्शीत्व जर गणित शिकणार्‍यास समजले तर त्याची या विषयातील रुची वाढेल.
पी.एन.जी. आणि अंकनादचा कोड वापरण्यासाठी -
विजेत्या विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट कोड वापरून अंकनाद अ‍ॅप्लिकेशनमधील 16 फाइलपैकी एका फाइलचा अ‍ॅक्सेस मोफत उपलब्ध करू देत आहोत.
1. प्ले स्टोअरमध्ये अंकनाद (AANKNAAD) सर्च करा आणि ते अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा.
2. अ‍ॅप्लिकेशनवर आपली नोंदणी (रजिस्ट्रेशन) करा.
3. आपली आवडती फाइल निवडून ‘अ‍ॅड टू कार्ट’ करून PNGJW100 हा कोड वापरून त्या फाइलचा अ‍ॅक्सेस मिळवा.