उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही सगळी मुलं मामाच्या गावी गेलो होतो. माझ्या मावशीची मुलं आली होती. आम्ही घरात बसून व्हीडिओ गेम खेळत होते. तेवढ्यात माझ्या आईने सर्वांना बोलावलं. आई म्हणाली, ‘सारखं सारखं व्हिडीओ गेम खेळण्यापेक्षा किंवा घरात बसून राहण्यापेक्षा तुम्ही बाहेर जाऊन खेळा.’ आई म्हणाली, ‘बाहेर खेळण्यासाठी अनेक खेळ आहेत खो-खो, लंगडी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर.’
आमच्यापैकी सुधीर म्हणाला, ‘आंधळी कोशिंबीर हा खेळ मी कधीच खेळलो नाही. आई म्हणाली, ‘अरे, हा खेळ खेळायला खूप मजा येते.’ आईने हा खेळ कसा खेळतात ते सांगितलं. आई म्हणाली खूप सोप्पं आहे एकाने दुसर्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची आणि एकाने त्याल गोल गोल फिरवून सोडायचे आणि बाकीच्यांनी पळायचे. ज्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असेल तो तुम्हाला पकडायला येईल, त्यातल्या एकाला तो पकडेल, तो आऊट.’
आम्ही सगळेजण आंधळी कोशिंबीर खेळत होतो. खरोखरंच खूप मजा येत होती. वेदांतच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. आम्ही सगळे त्याला चकवत होतो. कोणी त्याला अरे वेड्या मी इकडे आहे, तर कोणी त्याला असेच फसवत राहिले. तेवढ्यात आमचा दुसरा मित्र चंद्रपालला घेऊन त्याची आई आली, ती म्हणाली, ‘आमच्या चंद्रपालला पण खेळायला घ्या.’ आम्ही म्हणालो, ‘तो तर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मग त्याला कसं खेळता येईल?’ हे ऐकताच त्याची आई रडत घरी गेली. तिला खूप वाईट वाटलं. तेवढ्यात माझी आई आली आणि म्हणाली, ‘तुम्ही असं बोलायला नको होतं.’ चला त्याला पण घेऊन खेळा म्हणजे त्याला पण छान वाटेल.
आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही खेळ बंद करून एका झाडाखाली ओट्यावर बसलो. आम्ही विचार केला की प्रत्येकाला एका डोळ्याने पाहता येते, तर मग आम्ही विचार केला की प्रत्येकाने एक डोळा दान केला तर दोन्ही डोळ्याने आंधळे असलेल्या माणसांना एक डोळा जर त्यांना दिला तर ते पण संपूर्ण जग पाहू शकतो.
आजपासून आम्ही असा प्रचार करणार की ज्याला दोन डोळे आहेत, त्याने आपला एक डोळा दान करावा आणि आम्हीपण एक डोळा दान करणार.
- समिक्षा गणापूरे,
लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय