कसे लागले शोध ?

07 Apr 2022 11:31:00

kase lagale shodh 
 
डोळे उघडून बघा आमच्या भोवती घडते काय,
कसे लागले शोध शास्त्रज्ञांनी केले काय
झाडाखाली बसला होता न्यूटन गृहपाठ करत,
आवडायचे गणित त्याला बसला होता सोडवत,
इतक्यात त्याच्या डोक्यात धपकन सफरचंद पडले,
प्रश्न आणि टेंगूळ त्याच्या डोक्यात एकदम आले,
“फळ खालीच पडले कसे, वर का नाही गेले?
नियम गुरुत्वाकर्षणाचे न्यूटनने शोधले
आई त्याची म्हणते त्याला ‘टेंगूळाचे काय ?’
जेम्स बॅट म्हणे लहानपणी फारच अबोल होता,
आत्यासोबत एके दिवशी चहा करीत होता,
किटलीवारचे झाकण, आणि फडफड करीत होते
वाफेवरचे झाकण, आणि फडफड करीत होते
वाफेच्या त्या शक्तीची त्याला कल्पना आली,
वाफेवरच्या इंजिनाची गाडी धाऊ लागली,
आत्या म्हणे लागला शोध, चहा घेतोस काय?
आर्कीमिडीज एके दिवशी आंघोळ करीत होता,
राजाचा सोनेरी मुकुट डोक्यात घुमत होता,
सोन्याच्या मुकुटातली भेसळ शोधू कशी,
विचार करत करत त्याने पाण्यात मारली ढुशी,
पाणी सांडले बाहेर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला,
उघडा पळाला आर्किमिडीज तत्त्वाचा शोध लागला,
राज म्हणे ‘शाब्बास’! पण तू उघडा कसा काय ?
- प्रथमेश किशोर पाठक
Powered By Sangraha 9.0