एकदा एक पक्षी झाडावरती बसला,
उंच सूर लावून गाणे गाऊ लागला!
एकदा एक पक्षी झाडावर उड्या मारत होता,
उड्या मारता-मारता झोके घेत होता!
एकदा एक पक्षी नाचत होता,
निसर्गाच्या सानिध्यात रमून जात होता!
एकदा एक पक्षी पंख हलवत होता,
आपल्याला मिळालेल्या रुपासाठी आनंदी होता!
एकदा एक पक्षी झाडावर खात होता,
फळे आणि फुलांची गोडी अनुभवत होता!
एकदा एक पक्षी मनसोक्त उडत होता,
आयुष्य असेच जगावे असे सांगत होता!
एकदा एक पक्षी गाणे गात होता,
निसर्गाचा शोभा वाढवत होता!
एकदा एक पक्षी होता,
असं म्हणण्याचं कारण...
माणसानेच त्याला होत्याचं नव्हतं केलं!
- तनय नासिरकर, 6 वी,
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे