फळांची जत्रा!

शिक्षण विवेक    14-May-2022
Total Views |

Falanchi Jatra 
 
नाशिकची द्राक्षं
गोडंच गोड,
नागपूरच्या संत्र्याची
छानदार फोड...
वसईच्या केळ्यांचा
मोठा मान,
केळ्यांचे शिकरण
लागते छान...
पनवेलचे कलिंगड
लालच लाल,
खाऊन पाहाल तर
खूशच व्हाल!
अहमदाबादची बोरं
हिरवीगार,
खावीशी वाटतात
फारच फार!
पुरेत गप्पा,
तुम्ही थांबा,
फळांचा राजा,
मी आहे आंबा!
- स्नेहा सोनावणे, इ. 7 वी,