कोकण मेवा

शिक्षण विवेक    16-May-2022
Total Views |

kokan meva 
कोकणचा मेवा
सगळ्यांना हवा,
आपण घ्यावा
सगळ्यांना द्यावा...
हापूस, पायरी,
केशर आंबा,
बिट्टी, तोतापुरी
चोखून खावा...
कापा नि बरका
फणस काटेरी,
आठळ्या नि गर्‍यांची
चवच न्यारी...
जांभूळ खाताच
जीभ जांभळी,
डोंगरच्या मैनेची
काटेरी जाळी...
डोंगरची मैना
करवंद काळी,
ताटगोळ्यामध्ये
मधुर पाणी...
आंबटगोड अलूबुखार
आरोग्यास छान,
रवाळ कलिंगडास
उन्हाळ्यात मान...
कोकम सरबत
उन्हाळ्यात प्यावे,
शहाळ्याचे पाणी पिऊन
तृप्त व्हावे...
कोकण मेवा
असा लज्जतदार,
खाताना येते
मज्जा फार...
- मंजूषा खेडकर, मुख्याध्यापक,
मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे