स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्रात विज्ञान ग्रंथालयाचं उदघाटन

28 May 2022 18:42:34

Inauguration of Science Library 
 
स्वा.वीर सावरकर अध्यासन केंद्रात विज्ञान ग्रंथालायचं उदघाटन
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्ताने डेक्कन कॉर्नर येथील स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात मुलांसाठी विज्ञान ग्रंथालय उभे करण्यात आले असून विद्यार्थी या ग्रंथालयात येऊन विज्ञानविषयक पुस्तक बसून वाचू शकतील अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध लेखिका आश्लेषा महाजन, सावरकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत, कार्यवाह महेश पोहनेरकर, माधुरीताई सहस्रबुद्धे, नितीन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाचे उदघाटन आश्लेषा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान आणि नैतिकता यांच्या संगमातूनच अधिक उन्नत असा समाज निर्माण होऊ शकतो असं विधान प्रदीपदादा रावत यांनी केलं. त्याच बरोबरीने विज्ञान ग्रंथालयांचं महत्त्व, वाचनाच महत्त्व, शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या बदलाचे सूतोवाचही त्यांनी केलं. माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी वेळोवेळी स्वा.सावरकर अध्यासन केंद्रात महानगरपालिकेच्या सहकार्याने केलेल्या कामांची माहिती दिली. तर नितीन शेटे यांनी गावोगावी विज्ञान ग्रंथालयांची आवश्यकता असून ती उभारली जावीत अशी आशा व्यक्त केली. तर आश्लेषा महाजन यांनी एका विज्ञान कवितेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
याच वेळी शिक्षणविवेक आयोजित महामराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेतल्या विद्यार्थ्यांना, मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून २२ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून पहिल्या आलेल्या ३५० विद्यार्थ्यांची निवड झाली असून या कार्यक्रमात काही प्रातिनिधिक विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
Powered By Sangraha 9.0