‘आंबा’ फळांचा राजा. हा फळांचा राजा आपल्यापर्यंत कसा पाहोचतो? आंब्याच्या कोयीपासून आंबा कसा तयार होतो?
1) आंब्याच्या फळातील बीला ‘कोय’ असे म्हणतात. कोय जमिनीत लावली की, थोड्याच दिवसांत कोयीला अंकुर फुटतो.
2) हळूहळू पाने यायला लागतात. छोट्या म्हणजेच कोवळ्या पानांचा रंग केशरी गुलाबी असतो. नंतर तो गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.
3) हिरव्यागार आंब्याच्या झाडाला फुलं येतात. आंब्याच्या फुलांना ‘मोहोर’ असे म्हणतात. मोहोराला छान सुंगध येतो. साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात आंब्याच्या झाडाला मोहोर येतो.
4) मोहोर फुलून काही दिवसांतच त्याला लहान लहान फळे यायला लागतात. त्याला ‘कैरी’ असे म्हणतात. कैरीचा रंग गडद हिरवा असतो.
5) कैरीचा रंग हळूहळू लाल होत जाऊन पूर्ण पिकलेले फळ गडद केशरी किंवा पिवळ्या रंगाचे दिसते; तोच ‘आंबा’. एप्रिल-जून महिन्यात आंब्याच्या झाडाला आंबे येतात, म्हणून याच दिवसात आपल्याला बाजारात सर्वत्र आंबे दिसतात.
* आंबा आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय फळ आहे.
* आपल्या शेजारील बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्स देशाचे राष्ट्रचिन्ह आहे.