पपेट शो - डी.इ.एस. प्री-प्रायमरी स्कूल

शिक्षण विवेक    17-Jun-2022
Total Views |

puppet show - D.E.S. Pre-Primary School 
दि. १६ जून २०२२ रोजी, डी.ई.एस. प्रायमरी शाळेत, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणविवेकतर्फे ‘पपेट शो’चे सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी बर्वे आणि त्यांचा सहकारी शिक्षक वर्ग कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होता. तब्बल दोन वर्षांनी सुरू होणाऱ्या, शालेय शिक्षणाच्या पहिल्या दिवसाचं, पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचं स्वागत, शिक्षणविवेकतर्फे आयोजित ‘ससा तो ससा’ या पपेट शोने केले. या पपेट शोमधून ससा आणि कासवाची गोष्ट, अभिनव पद्धतीने सांगण्यात आली. पूर्व प्राथमिकच्या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पपेटमधील हलती चित्र बघून मुलं खूपच खूश होती. सादर होणाऱ्या गोष्टीमध्ये रममाण झाली होती. या पपेट शोला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.