एक दिवस पावसाचा

शिक्षण विवेक    20-Jun-2022
Total Views |

ek divas pavsacha 
 
धोधो धोधो पडतोय पाऊस,
केव्हापासून नुसता धुडगूस
रेल्वेगाड्या झाल्या ठप्प,
रस्त्यावरची वाहने गप्प
बाबा म्हणाले, ऑफिसला सुट्टी
मीही शाळेला मारली सुट्टी
आई करतेय भजी गरम
खमंग कुरकुरीत सुवास घमघम
सोबत आल्याचा मस्त चहा
खिडकीत बसून पाऊस पाहा
धोधो पाऊस धमाल मस्ती
त्याची माझी आहे दोस्ती
- ऋतुजा घाटे