पाऊस

शिक्षण विवेक    18-Jul-2022
Total Views |

paus  
 
आभाळात पावसाचे ढग काळे काळे
सरिच्या रूपात ते जमिनीवर आले॥
धडाडधुम ढग वाजे
मोर, बेडुक आनंदाने नाचे॥
आला आला पहिला पाऊस
आनंदाने नाचू गाऊ॥
मातीचा गंध सर्वत्र दरवळला
अंगणात माझ्या मोगरा फुलला॥
आषाढीची वारी निघाली पंढरीला
चालले विनवाया विठूराया॥

- स्वामिनी ससाणे
 रेणुका स्वरूप प्रशाला