पाऊस आला रे आला
सगळा निसर्ग हर्षित झाला
चहुकडे सुगंध मातीचा पसरे
डोंगरदर्यांतून वाहती झरे
बेडूकमामा आनंदित झाला
पाऊस आला रे आला...
पावसात या भिजती सगळे
प्राणी, फुले, पक्षी, मुले
मोर हर्षे नाचू लागला
पाऊस आला रे आला...
आभाळात चमे विजेची रेघ
पाणी ओतती सगळे मेघ
पाण्यात होड्या सोडू चला
पाऊस आला रे आला...
झाडे झाली हिरवी सगळी
फुले सुगंधित त्यावर उमलली
बदकासोबत पोहू चला
पाऊस आला रे आला...
- सोनाली अभय उपाध्ये
रेणावीकर विद्यामंदिर