देशभक्ती

शिक्षण विवेक    13-Aug-2022
Total Views |

Patriotism
 
देशभक्ती ही व्यापक भावना आहे. देशभक्तीची भावना सर्वत्र असते. या भावनेतूनच माणसामध्ये त्याग आणि सहकार्याची भावना जागृत होते. आपल्या देशाला कोणीही सेकंदात पाडू शकत नाही. देशभक्ती म्हणजे एखाद्याचे आपल्यावर असलेले प्रेम. देशभक्ती अशी गोष्ट आहे, जी देशासाठी निस्वार्थपणे काम करण्यास आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यास प्रवृत्त करते.
देशभक्ती म्हणजे आधी देशाचे हीत जाणून मग स्वत:चा विचार करणे. देशभक्तीची भावना स्वाभाविक आहे. आपण देशातीलच अन्न-पाणी खाऊन मोठे होतो, इथेच शिक्षण घेतो आणि इथेच जीवन जगत असतो. असा नागरिक आपल्या देशाला आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मानत असतो. देशाच्या रक्षणासाठी देशभक्त हसत-खेळत आपले तन-मन आणि संपत्ती अर्पण करतात आणि वेळ आली तर स्वत:च्या जीवाचासुद्धा विचार करत नाहीत. आपण आपल्या आईवर जितके प्रेम करतो, तेवढेच प्रेम आपण देशावर करतो. आपला देशसुद्धा आपले पालन-पोषण करतो आणि आपला विकास होण्यास मदत करतो. जेव्हा प्रत्येक जण देशाच्या भल्यासाठी काम करतो, तेव्हा देशाची प्रगती होते. देशभक्तीतून शांतता आणि एकोपा कायम राहील. नागरिकांमध्ये बंधुभावाची भावना निर्माण झाली की, ते एकमेकांना आधार देतील. त्यामुळे देश अधिक सामंजस्यपूर्ण होईल.
भारताला सुरुवातीपासूनच देशभक्तांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा, देशभक्तांचा हात होता. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारखे अनेक लढाऊ होऊन गेले.
स्वातंत्र्य काळातसुद्धा महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राजकुमारी अमृत कौर, विजयालक्ष्मी पंडित यांसारखे अनेक देशभक्त इथे जन्मास आले. आपल्या देशात यांसारखे अनेक अनेक देशभक्त होऊन गेले आहेत. जे फक्त देशासाठी जगले आणि त्यासाठी त्यांचे जीवन समर्पित करण्यासाठी त्यांनी अजिबात संकोच केला नाही. आपण अशा सर्व देशभक्तांची नेहमीच आठवण काढली पाहिजे आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास भावी पिढीला सांगून जागृत केले पाहिजे.
- जिज्ञासा झोरे, 8 वी,
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे