श्रावण

शिक्षण विवेक    18-Aug-2022
Total Views |

shravan 
 
हसत नाचत श्रावण आला
रान हिरवेगार करुन गेला
 
पाऊसात खावीशी वाटते मला भजी
भजी छान करते माझी आजी
 
श्रावणात असतात खूप सण
नागपंचमी, मोहरम आणि रक्षाबंधन
 
नागपंचमीला करतात नागाची पूजा
पावसात भिजायला येते खूप मजा
 
श्रावणात येतो स्वातंत्र्य दिन
पाऊस पडतो रिमझिम
- मंजिरी राऊत, 6 वी,
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे.