मला काय हवंय...

शिक्षण विवेक    19-Aug-2022
Total Views |

what I want 
 
शाळेकडून हवंय मला खूप काही
शिक्षण भेटण्याची मी वाट पाही
 
शिक्षकांकडून हवंय शिक्षण
वर्ग मैत्रिणीकडून आपले पण
 
वर्गशिक्षिका हव्या आहेत गोड
अभ्यासाचा नको असावा लोड
 
द्यावी आम्हाला चांगली शिक्षा
सोप्या असाव्या सार्‍या परीक्षा
 
शाळेत हवेत चांगले खेळ
विद्यार्थी शिक्षकांचा बसावा मेळ
 
जोपासल्या जाव्यात कला
त्याची आवड आहे मला
 
मिळावी सर्व गोष्टींची माहिती
शाळेची व्हावी खूप प्रगती
 
माझी शाळा आहे खूप छान
माझ्या शाळेवर मला अभिमान
पुनम पवार, इ. 9 वी,
श्री. सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव