पपेट सादरीकरण स्पर्धा निकाल २०२२

30 Aug 2022 18:11:45

puppet sadarikaran spardha nikal 2022 
शिक्षणविवेक आयोजित पपेट सादरीकरण स्पर्धा २९ ऑगस्ट २०२२ रोजी स्वा. वीर सावरकर अध्यासन केंद्रात सकाळी दहा ते सहा या वेळात संपन्न झाली. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शाळांमधील पूर्वप्राथमिक ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी 'शाळेच्या गोष्टी' हा विषय देण्यात आल्या होत्या. पडद्यामागून पालकांनी केलेल्या पपेटच्या साहाय्याने मुलांनी आपल्या सादरीकरणातून प्रत्यक्ष शाळा आणि शाळेत घडणाऱ्या अनेक गमतीजमती उभ्या केल्या.
सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी घेण्यात आला. या वेळी शिक्षणविवेकचे संपादकीय सल्लागार राजीव तांबे, कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, परीक्षक अतुल कुलकर्णी आणि ज्योती देशपांडे उपस्थित होत्या.
या वेळी शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर म्हणाल्या, 'स्पर्धा या आपल्यातल्या अनेक गोष्टींचा शोध घेण्यासाठी असतात. स्पर्धेत बक्षीस मिळणं, हा त्या स्पर्धेसाठी घेतलेल्या मेहनतीचं केवळ फळ असतं. आणि त्याच वेळी आपल्याला अधिक मोठ्या व्यासपीठावर जाण्यासाठी अधिक मेहनत घेण्यासाठीची एक जबाबदारीही असते.' तर राजीव तांबे यांनी पपेट सादरीकरणातील बारकावे सांगत, गोष्ट लेखन अधिक दमदार व्हायला हवं, तर सादरीकरण अधिक दमदार होईल, असं सांगितलं; तसेच काही उल्लेखनीय पपेट्सची नोंदही त्यांनी आवर्जून घेतली. आणि मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली शिगवण यांनी केले.
निकाल :
पूर्व-प्राथमिक गट
१) शि.प्र.मं. मुलींची शिशुशाळा, पुणे
पहिली व दुसरी गट
१) नवीन मराठी शाळा, पुणे
२) शिशुविहार प्राथमिक शाळा, कर्वेनगर, पुणे
३) नवीन मराठी शाळा, पुणे
तिसरी व चौथी गट
१) नवीन मराठी शाळा, पुणे
२) नवीन मराठी शाळा, पुणे
३) शिशुविहार प्राथमिक शाळा, कर्वेनगर
विशेष
नवीन मराठी शाळा, पुणे
पाचवी ते सातवी गट
१) न्यू इंग्लिश शाळा, रमणबाग, पुणे
२) शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळा, निगडी
३) ज्ञानप्रबोधिनी शाळा, सदाशिव पेठ
आठवी ते दहावी गट
१) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स,पुणे
२) महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर,पुणे
३) महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर,पुणे
Powered By Sangraha 9.0