ऋतुराज

शिक्षण विवेक    15-Sep-2022
Total Views |

ruturaj
 
शिशिरात अवनी गुलाबी
थंडीने पुरती गोठते
ऋतुराज अवतरतो तेव्हा
रंगबहार शेला पांघरते.
 
बहरला बकुळ फुलांनी
सडा टाकला प्राजक्ताने
निसर्ग नटला हिरवाईने
लुकलुकत्या दबबिंदूच्या थेंबाने.
 
गुलाबी होई पिंपळपान
तल्लीन होई बावरे मन
हळूच चाहूल देई वसंत
जणू निसर्गाला शृंगारचा छंद.
 
हळदीने माखला सुंदर बहावा
बोगनवेलाचा थाट काय पहावा
मनात उठे चैतन्याचा झरा
सुगंधित निशिगंध पांढरा.
 
ऐकू येतो कोकिळेचा स्वर्गीय स्वर
सजतो हा विदेशी निलमोहर
मन वेडे तल्लीन होते
स्वप्न मनीचे हिंदोळे घेते.
 
होई ऋतुराजाचे आगमन
अलगद निरोप घेइ शिशिर.
- शुभम खाकाळ, 9 वी,
रेणाविकर विद्या मंदिर