स्वामी विवेकानंद व्यक्ती एक – पैलू अनेक

शिक्षण विवेक    12-Jan-2023
Total Views |

Swami Vivekananda One Person – Many Aspects
 
इंग्रजांचे वर्चस्व असताना भारतभूमी व हिंदू धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारी आणि तन,मन, धन व प्राण यांच्या उद्धार कार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे ‘स्वामी विवेकानंद’. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत व वेदांतमार्गी राष्ट्रसंत आदि विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदू धर्माचे प्रसारक बनलेल्या तेजस्वी प्रतिभेचे युवक म्हणजे स्वामी विवेकानंद.
 
स्वामी विवेकानंद एक हिरा होते. हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. स्वामीजी लहान असताना त्यांना इतिहास, साहित्य अशा अनेक विषयांची आवड होती. त्यांनी तत्त्वज्ञान, धर्म, इतिहास, सामाजिक विज्ञान, कला व साहित्य इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान मिळवले. त्याचबरोबर त्यांनी वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास केला. पहिल्याच वर्गात स्वामीजींनी ‘अमरकोश’ पाठ केला. यावरून त्यांची बुद्धी किती असामान्य असेल याची कल्पना येते.
 
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, या उक्तीप्रमाणे स्वामीजींना लहान असताना त्यांना एका वैराग्याने ‘गरिबाला काहीतरी द्या हो’ म्हणून विनवणी केली. तो उघडावाघडा होता. ते पाहिल्याबरोबर नरेंद्रने आत जाऊन पलंगावर पडलेली वडिलांची एक किंमती शाल वैराग्याला देऊन टाकली. याच नरेंद्रने स्वामीजींना पुढे जाऊन सर्व जीवनच समाजाला देऊन टाकले.
स्वामीजी म्हणत, ‘ज्याला अंतिम सत्याचे ज्ञान झाले आहे तो सदा सर्वकाळ शांत आणि अविचलितराहतो. बाहेरच्या जगातील कोणतीही गोष्ट त्याला विचलित करू शकत नाही.’अशा प्रकारचे अविचल, स्थिर प्रवृत्तीचे, प्रचंड एकाग्रशक्तीअसलेले स्वामीजी होते.
 
स्वामीजींच्या चरित्राचा अभ्यास केला असता, प्रामुख्यानेएक गोष्ट दिसून येते ती म्हणजे स्वामीजींचे प्रचंड वाचन.पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्याचे विचार प्रगल्भ होतात.सर जॉन ल्युबक यांच्या समग्र वाङ्मयाच्या खंडांचे, एनसायक्लोपेडिया ऑफ ब्रिटानिका या जगप्रसिद्ध ज्ञानकोशांच्या खंडांचे त्यांनीवाचन केले.
 
एकोणिसाव्या शतकात समाजात 'जात' या गोष्टीला फारमहत्त्व होते. सर्व भारतात जातिभेद फार काटेकोरपणे पाळले जातहोते. स्वामीजींच्या घरातही ते पाळले जात होते. त्यांच्या घरातप्रत्येक जातीच्या लोकांसाठी स्वतंत्र हुक्का ठेवलेला असे. पण स्वामींनीसर्व टुक्के स्वतः ओढून पाहिले व त्यांनी त्यांच्या वडिलांना प्रश्नकेला की, सर्व हुक्के एकसारखेच आहेत तर आपल्याकडे घेणारीसगळी माणसे एकसारखीच असतात मग वेगवेगळे हुक्केकशासाठी? सध्याच्या काळात जातीवरून जे राजकरण केले जातआहे त्यावरून मानवजात ही एकच जात आहे असे ओरडूनसांगावेसे वाटते.
 
स्वामीजींच्या वडिलांचे देहावसन झाल्यानंतर ते देवीपुढेनोकरी मागण्यासाठी उभे राहिले. पण त्यांना वाटू लागले, "अरे,ही तर जगन्माता आहे. भक्तांचे सर्व मनोरथ ही पूर्ण करते.ही सर्वशक्तिमान आहे. हिच्याजवळ काय दोन घास अन्न आणि दोनकपडे मागायचे?" अन् म्हणून प्रत्यक्ष मागणे मागताना त्यांच्यातोंडून शब्द बाहेर पडले, " हे माते! मला ज्ञान दे! विवेक दे!वैराग्य दे!” असे अलौकिक मागणे मागणारी व्यक्ती सामान्यकशी असूशकेल?
 
आपल्या भारतीय संस्कृतीला अनेक थोर गुरूशिष्यांच्या जोडीचा वारसा लाभलेला आहे. त्यांपैकी एक म्हणजे रामकृष्णपरमहंस व स्वामी विवेकानंद या गुरू-शिष्याची जोडी हीअनोखी जोडी होती. इतिहासात डोकावल्यावर असे दिसतेकी शिष्य निवडीसाठी गुरू-शिष्याची परीक्षा घेतात. पणया अद्भुत, अलौकिक शिष्याने आपल्या गुरूचीच परीक्षाघेतली. हे काम फक्त विवेकानंदच करू शकतात. विवेकानंदांच्याया कृतीवर रामकृष्ण म्हणतात,“गुरूला गुरू म्हणून स्वीकारण्यापूर्वी त्याची परीक्षा अवश्यघेतली पाहिजे. आपली निष्ठा सत्यावर असली पाहिजे.गुरुच्या शब्दांवर नाही.”
 
स्वामीजींनी समग्र भारताचे दर्शन केले आहे. भारतभ्रमण करत असताना स्वामीजी कन्याकुमारीस आलेकन्याकुमारी येथील श्रीपाद शिलेवर'ध्यानस्थ’ बसावेअसे त्यांना वाटले. पण दयायला पैसेनसल्याने कोणीनावाडी त्यांना तेथे नेण्यास तयार नव्हती. पण स्वामीजींचीइच्छा तीव्र होती. म्हणून त्यांनी समुद्रात उडी घेतली आणिपोहत पोहत ती शिला गाठली. त्यांना ना उंच लाटांचीपर्वा होती, ना शार्क माशांची! आपले ध्येय गाठण्यासाठीप्राणाचीही तमा न बाळगणारे, ध्येयवेडे होते विवेकानंद.
 
धर्मसभेला जाण्याच्या अगोदर स्वामीजीनी चीन,जपान या देशातील काही भाग पाहिला. बुद्धभिक्कूंचा मठपाहिला. पाठीला चोर बांधून स्त्रिया नावा चालवत आहेहे त्यांनी पाहिले. घरंदाज नावाच्या खाली आपल्यादेशात स्त्रीला घरातच ठेवले जाते. आपल्याही देशातल्यास्त्रिया मुक्त झाल्या पाहिजे. त्यांनाही स्वतंत्र विचार करण्याचाअधिकार आहे असे विवेकानंदांना वाटले. स्त्री-पुरुष हेएकमेकांना पूरक आहेत. स्त्रियांकडे पाहणे सोपे आहे,परंतु स्त्री जीवनाचे निरीक्षण करणे अवघड आहे.
 
धर्मपरिषदेला जाण्याच्या अगोदर स्वामीजींनीएका जागतिक प्रदर्शनाला भेट दिली. त्या प्रदर्शनात एकूण ६०००० वस्तू होत्या. पण त्या प्रदर्शनात आकर्षणाचा वकौतुकाचा विषय ठरला तो म्हणजे स्वामीजींचा पेहराव.प्रत्येक व्यक्तीचे डोळे स्वामीजींवर खिळून राहिले होते.११ सप्टेंबर १८९३ ला झालेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींनी‘अमेरिकेतील माझ्या बंधुभगिनींनो' असे म्हणून उपस्थितांचीमने जिंकली. स्वामीजींनी सर्वांना बंधुभगिनीच्या नात्यानेजोडून घेतले आणि विश्वबंधुत्वावर नुसते भाषण न करताआपल्या शब्दांतून मावनेतून कृतीतून ते साकार झाले. स्वामीजींचेहे छोटेसे भाषण भारताच्या भविष्यकाळाला कलाटणी देणाराक्षण ठरला.
 
भारतीयांना चांगली संघटना उभी करता येत नाही. चार माणसेपाच मिनिटेही एकत्र काम करू शकत नाहीत याची खंत स्वामीजींनाआयुष्यभर होती. बालेष्ठ संघटना असती तर भारतावर परक्यांचेराज्य कधीच येऊ शकले नसते. अमेरिकी लोकांचा हा गुण भारतातरुजवण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केला. संघटनेचे महत्त्व जाणूनसंन्याशांची एक संघटना त्यांनी स्वतः उभारली.
 
भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाढ अभिमान असला तरीत्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, जातिभेद यांसारख्या हीनगोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून हल्ला चढवला व निद्रिस्तांनागदागदा हलवून जागे केले. अशा वेळी ते सौदामिनीच्या अभिनिवेशानेसमाजातील निष्क्रियतेवर प्रहार करत आणि देशबांधवांना जागेहोण्यासाठी कळकळीचे आवाहन करत. ‘निराकार समाधीन मग्नराहण्याची स्वतःची स्वाभाविक प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनीसर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखाच्या ऐहिक पातळीवरही विचार केला’आणि त्यांच्यासाठी झटले व 'परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेखरा संन्यास हे वचन सार्थ केले.
 
स्वामी विवेकानंदांचा तरुणांच्या क्षमतेवर प्रगाढ विश्वासम्हणजे त्यांच्या सामर्थ्याची जाणीव त्यांना होती. तारुण्याच्या वाटेवरअसताना अनेक आव्हानं-स्पर्धेला सामोरे जाणारा तरुण हा जगबदलवण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवतो. Give me hundrednachiketa and I will change the world असे म्हणणाऱ्यास्वामी विवेकानंदांना त्या काळातही तरुणांच्या शक्तीची कल्पना होती.आपल्या आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्याचीजडणघडण ही लहानपणापासूनच झाली पाहिजे. आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानाचा भडिमार न करता ध्येयाकडेवाटचाल करणाऱ्या प्रत्येक मुलाला 'संपूर्ण जग हाताततलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठीपुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे ' असे प्रश्न विचारणारेस्वामी विवेकानंद आजच्या पिढीचे प्रेरणास्थान ठरतात.
 
“चला उठा जागे व्हा, आणि तो पर्यंत थांबू नका
जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही."
 
अशा प्रकारचे महान विचार विवेकानंदांनी युवकांसमोरमांडले.'योग', 'राजयोग' आणि 'ज्ञानयोग' यासारख्या महानग्रंथांची रचना करून त्यांनी युवा जगताला नवीन मार्ग दाखविलाआहे. कन्याकुमारी या ठिकाणी समुद्राच्या आत असलेले त्यांचेस्मारक आजसुद्धा संपूर्ण जगाला त्यांच्या महानतेचे दर्शन घडवते.
 
'साध्य काय आहे हे जर माहिती करून घ्यायचे असेल तर आपणास असाध्याच्या पुढे जावे लागेल.',अशा प्रकारचे महानव्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांचे होते. त्यांनी आपल्याधार्मिक, अध्यात्मिक ज्ञानाच्या बळावर संपूर्ण मानव वर्गाला आपल्यारचनांच्या माध्यमातून शिकवण दिली. स्वामीजी हे केवळ स्वतःपुरतेजगले नाहीत, तर समाज, देश व राष्ट्राकरिता त्यांनी आपले आयुष्यवेचले. म्हणूनच ते"अजरामर ठरले. त्यांचे अनुकरण करणे हे आपलकर्तव्य आहे. दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या अशा थोर योगपुरुषाकडूनप्रेरणा घ्यावयास हवी. म्हणून म्हणावेसे वाटते.
 
थोर महात्मे होऊन गेले,
चरित्र त्यांचे पाहा जरा !
आपण त्यांच्या समान व्हावे,
हाचि सापडे बोध खरा !
 
- संध्या वाल्मिक झनान
शिशुविहार प्राथमिक विद्यापीठ शाळा, पुणे
संपर्क क्रमांक - ७०२००६५४०७