एस.पी.एम इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल यमुना नगर निगडी या शाळेत गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

11 Oct 2023 11:40:07

एस.पी.एम इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल यमुना नगर निगडी या शाळेत गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
एस.पी.एम इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल यमुना नगर निगडी या शाळेने 2 ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्ताने
स्वच्छता अभियान राबवले. इयत्ता नववी व दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांनी निगडी येथील कृष्ण मंदिराची भेट घेऊन
तेथील सर्व परिसराची स्वच्छता केली. या निमित्त मंदिराच्या प्रशासनान अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक
केले. विद्यार्थ्यांना मंदिराच्या वतीने प्रसादही देण्यात आला.
तसेच इयत्ता आठवीचे चे विद्यार्थी नाना नानी पार्क येथे स्वच्छतेसाठी गेले होते विद्यार्थ्यांनी सर्व परिसर झाडून
स्वच्छ केला. परिसरातील सर्व प्लास्टिक उचलून परिसर प्लास्टिक मुक्त केला.
या उपक्रमानिमित्त परिसरातील सर्व लोकांनी विद्यार्थ्यांचे फार कौतुक केले आहे.
या उपक्रमाची मूळ कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका लीना वर्तक यांची होती. शिक्षिका रंजना चौधरी, जयश्री
सोनार, विद्या दिघे, शुभांगी डोंगरे, कांचन नारखेडे ,सोनाली देशमुख, मोनिका काळे, स्वाती राहींज या शिक्षकांनी
अथक परिश्रम घेतले.
इयत्ता पाचवी व सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता केली. तसेच शाळेबाहेरील रस्ता साफ करणाऱ्या
काका आणि मावशींचां शाळेच्या वतीने सत्कार केला गेला.
Powered By Sangraha 9.0