कुरकुरीत फ्लॉवर भजी

11 Oct 2023 10:00:39

कुरकुरीत फ्लॉवर भजी
एक दिवस भरपूर पाऊस होता आणि माझ्या शाळेला अचानक सुट्टी मिळाली. आईला आठवड्यातून एकदा काहीतरी नवीन पदार्थ करून आम्हांला खायला घालायची हौस असते. त्यादिवशी पाऊसही भरपूर प्रमाणात होता आणि थंडीही वाजत होती. आईला आम्ही काही तरी कुरकुरीत कर असे सांगितले. आईने आम्हांला विचारले काय करू? आम्ही बहीण-भावांनी फ्लॉवरची भजी करायला सांगितली. आईने फ्लॉवरची भजी करायला घेतली. त्या वेळेस मी आईजवळ गेले. आई भजी करत होती. तेव्हा मी बघितले, तिने फ्लॉवरचे बारीकबारीक तुकडे करून, बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ घालून, फ्लॉवर आणि पीठ एकत्र करून त्यांच्यामध्ये पाणी घालून, मळून ते तेलामध्ये टाकून, व्यवस्थित तळून घेतले. काही वेळाने आईने ती गरमगरम भजी खायला आणून दिली. पाऊस पडत असल्यामुळे आणि थंडी वाजत असल्यामुळे, गरमगरम भजी खाण्यात वेगळीच मजा येत होती. त्या वेळेस मस्तमस्त गप्पागोष्टी करून कुरकुरीत भजी खाण्याचा आनंद आम्ही पुरेपुर उपभोगला.
- स्वप्नाली सदगिर, 
विद्यामंदिर मांडा, टिटवाळा
Powered By Sangraha 9.0