उठा चला उठा, सज्ज होऊ या,
ज्ञानरचनावादाची कास धरू या.
निरीक्षणातून नवीन ज्ञान मिळवून,
विशेष प्रगती करू या.
तोंडीकामातून गायन, वाचन करून,
पाठांतर अन् चिंतन वाढवू या.
प्रात्यक्षिकासह अनुभव घेऊन,
खिलाडूवृत्ती अंगी बाणवू या.
कृतिरुक्त कला अन् प्रयोग करून,
कौशल्य अन् प्रयोगशीलता दाखवू या.
सहशालेय अनं नवोपक्रमातून,
सुप्तगुणांचा विकास करू या.
प्रकल्प कल्पकतेने मांडून,
कुशलता अन् सृजनशीलता सिद्ध करू या.
बालपणाचे वय विसरून,
नव्या जीवनाशी मैत्री करू या.
परिक्षा अन् स्पर्धांशी सामना करून,
यशशिखरावर विजय मिळवू या.
सर्वगुणसंपन्न विद्यार्थी होऊन,
ध्येय अपुले गाठू या.
अन् भविष्य अपुले उज्ज्वल करू या,
भविष्य अपुले उज्ज्वल करू या.
- संगीता साळुंके, उपशिक्षिका
नवीन मराठी शाळा, वाई