साहित्य : ५ चमचे गव्हले, ६-७ चमचे साखर, १ ते दीड कप दूध, १ चमचा साजूक तूप, काजू, बदाम, पिस्ता, वेलदोड्याची पूड
कृती : प्रथम पॅनमध्ये साजूक तूप घालून गव्हले भाजून घ्या. गव्हले खरपूस भाजून झाल्यावर रामध्ये काजू, बदाम, पिस्ते यांचे तुकडे घाला. नंतर रात दूध घाला. ७-८ मि. मंद आचेवर शिजू द्या. अधूनमधून ढवळत रहा. अजून कपभर दूध घाला. आता यात साखर घाला. आणखी दहा मिनिटे खीर व्यवस्थित शिजू द्या. आता रात वेलची पूड घाला. पौष्टिक गव्हल्यांची खीर तयार. आपल्याकडे शुभकार्यासाठी केलेल्या नेवैद्याच्या पानात गव्हल्यांची खीर वाढली जाते.