डी.ई.एस सेकंडरी शाळेत पालकांसाठी आयुर्वेद मार्गदर्शनपर व्याख्यान

16 Oct 2023 15:41:37

डी.ई.एस सेकंडरी शाळेत पालकांसाठी आयुर्वेद मार्गदर्शनपर व्याख्यान
   पुणे: येथील टिळक रोड येथील डी.ई.एस.सेकंडरी शाळेत आज दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासासाठी डॉ. सागर साळुंके यांचे पालकांसाठी आयुर्वेद मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती बोधे, उपमुख्याध्यापिका विजया जोशी, पर्यवेक्षिका लक्ष्मी मालेपाटी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
   प्रारंभी विजया जोशी यांनी प्रास्ताविक व डॉ. सागर साळुंके यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी ज्योती बोधे यांच्या हस्ते डॉक्टर सागर साळुंखे यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. यानंतर ज्योती बोधे यांनी पालकांशी संवाद साधला व आयुर्वेद व्याख्यानाचे महत्त्व विशद केले.तसेच पालकांनी मुलांसाठी जागरूक राहण्याचे आवाहनही केले.
   डॉ.साळुंके यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात आयुर्वेदच्या साह्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधल्या जाऊ शकतो असे सांगितले.शिवाय विद्यार्थ्यांची बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढण्यासाठी पीपीटीच्या साह्याने संवाद साधला. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, मेंदूची जडणघडण, एकाग्रता, विद्यार्थ्यांना परीक्षेची वाटणारी भीती, विद्यार्थ्यांच्या आकलना संदर्भातील समस्या, त्यांची चंचल अवस्था अशा विविध विषयावर, प्रश्नांवर चर्चा केली. पालकांशी संवाद साधला. एवढेच नाहीतर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कसे बसायचे हे सांगून विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातले उपाय व औषधांची नावे सुद्धा सांगितली. व्याख्यानाला पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
Powered By Sangraha 9.0