नवरात्र उत्सव

20 Oct 2023 11:18:40


नवरात्र उत्सव 

   नवरात्र हा भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. दैत्यराज महिषासुरावर देवी दुर्गेचा विजय साजरा केला जातो.

   संस्कृतमध्ये नव म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्री. म्हणून त्या उत्सवाच्या नऊ रात्री. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला प्रतिपाद आणि शेवटच्या दिवसाला नवमी म्हणतात.

   नवरात्रीत लोक नऊ दिवस उपवास करतात. आपण वर्षातून दोन दिवस नवरात्री साजरी करतो. अश्विन महिन्याचा पहिल्या दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात.

   नवरात्रीला नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भजन – कीर्तन तसेच अनेक देखाव्यांचे आयोजन केले जाते. ते बघायला लोक एकत्र येतात. नवरात्रीत नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. देविप्रमाणे सर्व स्त्रिया नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात.

स्वरा सचिन भोसले,चौथी

नवीन मराठी शाळा, वाई.


Powered By Sangraha 9.0