डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेमध्ये आज पारंपारिक पद्धतीने भोंडला साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती चे पूजन म्हणजेच पाटी पूजन करण्यात आले.
यानंतर मैदानावर शाळेच्या मुख्या. सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री विठ्ठल मोरे यांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले.
यानंतर अनघा कडू यांनी भोंडल्याची माहिती सांगितली व समीक्षा इसवे , अनिता येनगुल यांनी भोंडल्याची पारंपारिक गाणी सादर केली. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत आले होते. अक्कण माती चिक्कन माती , एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू , श्रीकांता कमलकांता..... या गाण्यानंतर गरबा , दांडिया यांची गाणी लावण्यात आली व यावर विद्यार्थ्यांनी दांडियाचा आनंद लुटला..... अशा प्रमाणे पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही प्रकाराने भोंडला साजरा करण्यात आला.
शब्दांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर