इतिहासाच्या पानावर कोरलंय नाव
म्हणे इतिहासाच्या अंधारात तरी कंदील लाव.
कंदीलाच्या डिबरीत सापडेल आपला स्वतंत्र कोपरा
थोडावेळ तरी विसरा वर्तमानातील सापळा
वाटतं निजावं जिजाऊंच्या कुशीत,
स्वातंत्र्यासाठी लढावे शिवरायांच्या शिस्तीत.
शिकावा छत्रपतींकडून गनिमी कावा,
शिंपडावा भारतभर चरित्र्याचा ठेवा.
नको आजचे राजकारण,
माणुसकी विसरून सुबत्तासारण
राजेंनी शिकवला स्वाभिमान माणूसकीचा
तरी राजकारण्यांनी केलाय बाजार पैशांचा.
- वरदा घाटपांडे, 8 वी,
म. ए. सो वाघीरे विद्यालय, सासवड