दिवाळीच्या फराळांचा संदेश

11 Nov 2023 07:00:00


दिवाळीच्या फराळांचा संदेश 
दिवाळीच्या फराळांचा संदेश

दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांच्या रोषणाईचा, छान, छान पदार्थांचा आस्वाद घेण्याचा, तुम्ही हे सर्व करून छान

पदार्थ खात आनंद लुटता नां ? मग मुलानो हे ही अनुभवा की दिवे तुम्हाला प्रकाशमय आयुष्य जगायला शिकवतात, दिवाळीचा खाऊ प्रत्येक पदार्थ काहीतरी सुचवीत असतो. तुमच्या संस्कारी जीवनासाठी करू तर पहा !

ही सर्व खाद्यसंस्कृती काय सांगते पहा !

लाडू – मी आहे गरगरीत, घट्ट – मुट्ट, सर्वांना धरून ठेवणारा, गोड बोलणारा म्हणून मी देवाजवळ असतोच.

करंजी – मी आहे वाकडी कधीच ताठ नसणारी, पण माझा गोडवा पाहून छोट्या मित्रांना नेहमीच हवीहवीशी वाटणारी.

चिवडा –आधी असतो एकटा पण नंतर सर्वात मिसळुन होतो दुकटा. आणि होतो खुमासदार.

चकली – असले जरी मी काटेरी तरी दुसऱ्याला नाही मी बोचणारी, म्हणूनच सर्वाना हवीहवीशी वाटणारी.

शंकरपाळे – मी आहे एकसारखा म्हणूनच कधी भेद न करणारा

शेव – मी आहे हलकीफुलकी, नाजूक पण खूप कामाची माझ्याशिवाय रंगत नाही यायची

कडबोळे – तोंड गप्प ठेवतो, वळकटी करून बसतो पण सर्वांसमवेत हजर राहायचेच ठरवतो.

अनरसा – येतो कधीतरी भेटायला. आहे जरा कडक शिस्तीचा पण जेव्हा भेटतो तेव्हा खूप असतो प्रेमाचा.

मुलांनो, प्रत्येक दिवाळीत आम्हाला जरूर आठवण करा छान दिवाळी साजरी करा, मज्जा करा.

सौ. स्नेहलता रा.वैद्य

Powered By Sangraha 9.0