आर्य चाणक्य मध्ये दिव्य शिवोत्सव जल्लोषात संपन्न

30 Nov 2023 16:29:46
 
आर्य चाणक्य मध्ये दिव्य शिवोत्सव जल्लोषात संपन्न
*१५हजार दिव्यातून साकारली  छ.शिवाजी महाराजांची प्रतिमा*
पैठण (प्रतिनिधी):- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था , अंबाजोगाई द्वारा संचालित आर्य चाणक्य प्रा. विद्यामंदिर, पैठण नेहमीच आगळे वेगळे, आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेत असते. दीपावलीच्या, पूर्व संध्येला छ. शिवाजी महाराजांच्या ३५० या राज्याभिषेक वर्षा निमिताने १५००० पणत्यांच्या सहाय्याने छ. शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी प्रतिमा शालेय मैदानात साकारण्यात आली. यासमवेतच ५४किलो फुले, ४५ किलो रांगोळी च्या सहायाने "दिव्य शिवोत्सव व राजमुद्रा " साकारण्यात आली होती. भगव्या ध्वजा खाली ही शिव प्रतिमा समोर ३५० तोफांची (फटाक्यांची) सलामी देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन डॉ. जयंत जोशी यांनी केली.
दिव्य शिवोत्सव कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष आहेर,सुदाम पोल्हारे, विकास देशमुख, सर्फराज अंबेकर, गणेश माळवदकर, मनोज शिंगारे, प्रियंका निकाळजे, राखी धोकटे, गीतांजली शेवतेकर आदी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, रिक्षा चालक-मालक अंकल, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, मार्गदर्शक डॉ. जयंत जोशी, प्रमुख पाहुणे महेश चन्ने, डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी, किशोर भाकरे ,रेणुकादास गर्गे, मनोज शुक्ल, डॉ. सुनिल गायकवाड, अनिल कावसानकर,अशोक शेवतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या समवेत मोठ्या संस्थेने पालक, विद्यार्थी व पैठणकर नागरिकांनी सुवर्णक्षण अनुभवला.
भव्य दिव्य कार्यक्रमास महेश चन्ने, संजय ठेणगे, रामसिंग परदेशी, सुरेश पाटील, वर्षा पाडळकर,विनोद सरोदे व पालकवर्ग आदींचे विशेष सौजन्य लाभल्यामुळे कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विलास खर्डेकर व शिखा शाह यांनी केले.
संकलन:-आशुतोष प्रकाश पानगे
*बॉक्समध्ये* :-
🚩१५हजार पणत्या ,१०५ लिटर तेल ,३०हजार वाती ,५४ किलो फुले, ४५ किलो रांगोळी ,८×१६चा भगवा ध्वज
🚩विद्यार्थ्यांनी जमवल्या ५००० पणत्या
🚩१५हजार पणत्या लावल्या अवघ्या २२मिनीटात टीम वर्क चे प्रदर्शन
🚩छ. शिवाजी महाराजांच्या ३५० या राज्याभिषेक वर्षा निमिताने
🚩३५० तोफांची (फटाक्यांची) सलामी
🚩२एकर परिसरात साकारली प्रतिमा
🚩शाळेतील प्रत्येक शिक्षकाचे १००%योग
Powered By Sangraha 9.0