शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी, शाळेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा

07 Nov 2023 12:34:11

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आगळ्यावेगळ्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा 1 
   दि. २३ ऑक्टोबर २०२३ वार :सोमवार रोजी शाळेमध्ये पिंपरी -चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयं रोजगार निर्मिती करणाऱ्या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये निवेदिता कछवा , अमृता विप्र, मीनल शुक्ल, शुभांगी पिलनकर, अंकिता राऊत, प्राजक्ता चव्हाण, विनिता देशपांडे, स्मिता बोकील, स्वाती देशपांडे, वीणा बडगुजर, शितल घोडके यांचा समावेश होता.
त्याचबरोबर मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली.
सर्व मान्यवर, सन्मानित करण्यात आलेल्या नवदुर्गां,शाळा समिती अध्यक्ष मा. श्री दामोदर भंडारी सर आणि सर्व मा.मुख्याध्यापक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेमध्ये पाटी पूजन करण्यात आले.
याच दिवशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रावण दहन करण्यात आले विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आपले अवगुण एका चिठ्ठीवर लिहून आणले होते व त्याचे दहन करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकडून डाळ, तांदूळ,साबण, तेल अश्या वस्तूंचे संकलन करण्यात आले व ते समाजातील गरजू विद्यार्थी व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत काम करणाऱ्या संस्था यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले.
याशिवाय नवरात्र उत्सवानिमित्त शाळेमध्ये आई पालकांसाठी दांडीया व भोंडल्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाला आई पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वरील सर्व कार्यक्रमांसाठी शाळेचे शाला समिती अध्यक्ष मा.श्री दामोदर भंडारी सर उपस्थित होते.आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मा. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम संपन्न केला.
Powered By Sangraha 9.0