
दि.८ ऑक्टोबर २०२३ वार : रविवार रोजी शि.प्र. मंडळीच्या एस.पी. एम निगडी शाळेत पालकांसाठी पालक शाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते म्हणून करिअर कौन्सिलर मा. श्री. संजय कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकां बरोबरच पालकांचा मोठा वाटा असतो . शाळा व आपण सर्व पालक हे एक कुटुंब आहोत. आजची ही लहान पिढी, आपल्या कुटुंबाचे, भारताचे भविष्यातील भवितव्य आहेत. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडेल या विचाराने कार्यशाळेचा आयोजन करण्यात आले होते. पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे आपली कुटुंब व्यवस्था नष्ट होत आहे.मी आणि माझे या प्रवृत्तीमुळे स्वार्थ व सोय याचाच विचार होतो. खरे तर भारतीय संस्कृती व संस्कार यापासून आपण दूर होत आहोत त्यामुळे कुटुंब, समाज व देश याचा विचार होत नाही. पालकांनी भारतीय संस्कार, त्यामागील अर्थ लक्षात घेऊन मुलांवर संस्कार केले पाहिजेत. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. सध्याची पिढी खूपच हुशार आहे त्यामुळे स्वतंत्र विचाराची आहे.पालकांपुढे फार मोठे आव्हान आहे की, त्यांना भारतीय संस्कारांचे शिक्षण दिले पाहिजे असे मार्गदर्शन व आव्हान प्रमुख पाहुणे यांनी सर्व पालकांना केले.
या कार्यशाळेसाठी शाळेतील छोटा गट ते दहावीपर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थ्यांचे जवळजवळ १००० पालक उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन शाळा समिती अध्यक्ष मा. श्री दामोदरजी भंडारी नियामक मंडळ सदस्य मा.श्री सुधीर काळकर मा.मुख्याध्यापिका सौ. ज्योती बक्षी ,सौ.लीना वर्तक , सौ. उमा घोळे,श्री.रविंद्र मुंगसे व सौ.सविता बिराजदार . सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले .कार्यसक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.अश्विनी महाजन,सौ. शिल्पा मोटे, सौ. गौरी दुराफे व सौ. अर्चना कुलकर्णी यांनी केले.