' शिक्षणविवेक' च्या दिवाळी अंकाचे; तसेच ' युवाविवेक' च्या ई - दिवाळी अंकाचे प्रकाशन

08 Nov 2023 11:43:20


' शिक्षणविवेक' च्या दिवाळी अंकाचे; तसेच ' युवाविवेक' च्या ई - दिवाळी अंकाचे प्रकाशन

शनिवार, दिनांक ०४-११-२०२३ रोजी डी.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिवाळी अंकांचे प्रकाशन आणि बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यामध्ये ' शिक्षणविवेक' च्या दिवाळी अंकाचे; तसेच ' युवाविवेक' च्या ई - दिवाळी अंकाचे प्रकाशन बाबा शिंदे आणि स्वाती राजे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बाबा शिंदे यांनी शिक्षणविवेकचे कौतुक केले, तर स्वाती राजे यांनी बालकथेचे अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना कुडतरकर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी शिक्षणविवेकच्या एकूण कारकीर्दीचा आढावा घेतला आणि युवाविवेक या युवकांसाठी असलेल्या व्यासपीठाची माहिती दिली. शिक्षणविवेकच्या बाल साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले. 'युवाविवेक'च्या आगामी 'काव्यविवेक' या काव्य महोत्सवला येऊन आपली कविता सादर करता येईल असेही सांगितले. त्यांनंतर शिक्षणविवेक आणि युवाविवेक या दोन्ही दिवाळी अंकाच्या लेखकांचे सत्कार करण्यात आले. शिक्षणविवेकद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण केले गेले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
Powered By Sangraha 9.0