कोरा कागद, निळी शाई

22 Dec 2023 10:40:22

कोरा कागद, निळी शाई
सहज नजर गेली कोर्‍या कागदावर,
पाहून हसत होता माझ्यावर
हल्ली कुठे गेली तुझी शब्द सरिता,
लिहित नाही आत्ता तू कविता
कोर्‍या कागदावरची कविता,
विचारत होती मला पुन्हा पुन्हा
कुठे गेले विचार, कुठे गेले भाव,
उतरव आता तरी त्याला.
घे तू शब्दांची उंच भरारी,
रंगवून टाक निळ्या रंगानी
कोरं ठेवु नको याला,
या शिवाय करमत नाही मला
विचारांना दे कलाटणी,
उत्तरव ते माझ्यावर
भिजवुन टाक निळ्या शाईनी,
दिसुदे सागराच्या लाटा तुझ्या ही
निळा शालू बनव मला,
शब्दालंकारांनी सजव मला
विसरु नकोस,
या तुझ्या मित्राला.
सुख दुःखांनी नटव मला,
थांबून नकोस स्वतःला
काळीज उलगडून ठेव हवं तर,
बनवून तर बग मित्र कागदाला
 
- सानिका साबळे, 
श्री सिद्धेश्वर माध्यमिक विदयालय, माजलगाव.
Powered By Sangraha 9.0