आयुष्य

23 Dec 2023 10:35:51

आयुष्य
हसावसं वाटलं तर हसायचं
झोपावसं वाटलं तर झोपायचं.
पूर्ण करता येईल असं
स्वप्न मात्र बघायचं.
खेळावस वाटलं तर खेळायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
बदलत्या जगासोबत
आपणही बदलायचं.
सोप्या सुटणार्‍या या कोड्याला
अवघड का बरं म्हणायचं.
साधं सोपं आयुष्य
साधं सोप्प जगायचं.
कार्तिकी संजय पारठे,
प्राथमिक विद्यालय, विवेकानंद संकुल सानपाडा.
Powered By Sangraha 9.0