आजीचा पारंपरिक पौष्टिक खाऊ

08 Dec 2023 11:29:00

आजीचा पारंपरिक पौष्टिक खाऊ
बदाम पुरी
साहित्य : कणीक १ वाटी, २ टे.स्पून रवा, २ टे.स्पून मैदा, ४ टे.स्पून साजूक तूप, आवश्यकतेनुसार पाणी
सारण : १ वाटी बदाम पूड, १/२ वाटी गूळ, १/४ वाटी सुकं खोबरं, वेलची पूड, केशर (आवडीनुसार)
कृती : कणीक, मैदा, रवा आणि साजूक तूप एकत्र करून गार पाण्यात घट्ट भिजवणे, (पुरी प्रमाणे) नंतर बदाम पूड, गूळ, सुकं खोबरं एकत्र करून घेणे, त्यात थोडी वेलची पूड घालून हाताने चांगलं एकजीव करून घेणे.
कणकेची मध्यम आकाराची पारी लाटून त्यात सारण भरून, ती बंद करून घेणे (पराठ्याचे सारण भरतो तसे) आणि थोडी जाडसर लाटून घेणे. आता पॅन गरम करून घेणे आणि साजूक तुपात दोन्हीं बाजूंनी खरपूस भाजून घेणे. बदाम पुरी खाण्यासाठी तयार.
टिप : ह्या बदाम पुर्‍या फ्रिज शिवाय आठ दिवस चांगल्या टिकतात.
Powered By Sangraha 9.0