सहवास

30 May 2023 14:30:00


सहवास

आईसमोर बसले की,

आयुष्य किती कष्टपूर्ण आहे हे कळेल.

निरागस लहान बाळासमोर बसले की,

आयुष्य किती सुखाचे आहे हे कळेल

साधुसंतांसमोर बसले की,

सर्व काही दान करावेसे वाटेल

व्यापाऱ्यासमोर बसले की,

कमवलेली संपत्ती किती कवडीमोल आहे असे वाटेल

शिक्षकासमोर बसले की,

विद्यार्थी होण्याची उत्तुंग इच्छाशक्ती निर्माण होईल

शेतकरी, कामगारासमोर बसले की,

हार्ड वर्क करतो असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल

सैनिकांसमोर बसले की,

फक्त त्याग आणि त्याग याचा साक्षात्कार पाहायला मिळेल

मित्रांसमोर बसले की,

स्वर्ग ज्याला म्हणतात तो स्वर्ग पाहायला मिळेल

सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!

- प्राजक्ता गणेश भोंगाळे, . 9 वी,

विद्यामंदिर मांडा टिटवाळा

Powered By Sangraha 9.0