नाती

31 May 2023 10:30:00


नाती

नाती म्हणजे असे बंधन

जिथे असते प्रेमाची गुंफण॥धृ॥

या बंधनातून काय हवं, हवा मला विश्वास

कौतुकाची थाप आणि अस्तित्वाचा ध्यास॥1

उमेदीच्या वाटेवर असावा त्यांचा सहवास

फक्त सोबत असण्याचा नको नुसता आभास॥2

नात्यांच्या बंधनामुळे मिळावा नवा आत्मविश्वास

हातामध्ये हात घेऊन एकीने घडवायचा आहे विकास॥3

प्रेम, जिव्हाळा, माया, ममता जिथे असावा प्रेमाचा सागर

अतुट बंधन गुंफून करावा घट्ट नात्यांचा आदर॥4

म्हणूनच म्हणावे, नाती म्हणजे असे बंधन

जिथे असते प्रेमाची गुंफण॥धृ॥

- ओवी सुनील उंबरकर

जानकीबाई प्रेममुख झंवर मराठी शाळा

इयत्ता 2री

Powered By Sangraha 9.0