निसर्गरम्य कोकण

03 Jun 2023 16:30:00


निसर्गरम्य कोकण

कोकण म्हटलं की, दाट झाडी, अथांग पसरलेला समुद्र, सुपारीची, नारळाची, आंब्यांची झाडे. निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतुमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. या निसर्गरम्य कोकणात समुद्र किनारे, वळणावळणाचे रस्ते, सागरी किल्ले, कौलारू घरे पाहण्यसाठी पर्यटकांची पसंती कायमच असते.

मी पाहिलेले कोकण आणि मला अनुभवयास आलेली इथली कोकण संस्कृती आणि कोकणातील लोक वेगळीच. प्रामुख्याने कोकणात कोकणी, मालवणी, मराठी या भाषा बोलल्या जातात.

श्रावणात कोकणचे माळराने रानफुलांनी बहरून येतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्यांनी नटलेली आहे. समुद्र किनारी फिरणे, लाटा पहात वेळ घालवणे हा अनुभव काही वेगळाच. निसर्गप्रेमींसाठी सगळ्यात चांगलं ठिकाण. नेचर फोटोग्राफीसाठी तारकर्ली किनारा उत्तम. “कोकण मराठी साहित्य परिषदेने, कवी कृष्णाजी ‌‘केशव दामले' उर्फ ‌‘केशवसूत' यांचं स्मारक उभारलं आहे. कोकणाची ही मस्त हिरवाई पर्यटकांचं मन मोहीत करीत आहे. केवळ मासेच नव्हे, तर कोकणातील शाकाहारी पदार्थही लोकप्रिय आहेत. असं हे कोकण मित्र किंवा कुटुंबीयांसाठी अतिशय योग्य पर्याय आहे.

असं मी पाहिलेलं कोकण निसर्गरम्य आणि कायमच आठवणीत राहणार रमणीय आहे.

- वैष्णवी काळेबेरे, 8वी,

सरस्वती

Powered By Sangraha 9.0