जिद्द

05 Jun 2023 14:30:00


जिद्द

एक छोटेसे पण टुमदार असे गाव होते. त्या गावाजवळ घनदाट असे जंगल होते. त्या गावामध्ये चिनू नावाचा मुलगा त्याच्या आजीसोबत राहत होता. चिनु च्या घरची परिस्थिती बेताचिच होती. आजी अंगणात जाऊन जमेल तशी फळे आणायची आणि आठवडी बाजारामध्ये विकायची त्यावरच त्यांच घर चालत असे शेजारी कधी - कधी मदत ही करत.

आजी तशी स्वभावाने मायाळु आणि कर्तव्यदक्ष अशी होती. आपल्या एकुलत्या ऐक नातवाला मोठ्या कष्टाने शिकवीत होती तिला वाटायचे की आपल्या नातवाने म्हणजे चीनुने खुप शिकाव, मोठ व्हाव त्याच नाव व्हाव. त्याला लोकांनी ओळखाव लोकांनी त्याच कौतुक करावे. आणि चिनु पण आपल्या आजीच्या स्वप्नाशी एकनिष्ठ होता. तो अभ्यासात हुशार होताच, पण त्याचबरोबरच तो वेगवेगळी चित्र, कलाकृती, कोरीवकाम मूर्ति बनविणे यामध्येही निपुन होता. पण घरची परिस्थिती हलाखिची आजी बिचारी कष्ट करून घर चालवायची. त्यातच चिनुचे शिक्षण ही सुरु. सुट्टीच्या दिवशी वेळ मिळाला तसा चिनु ही आजीला खुप मदत करायचा.

एके दिवशी चीनुच्या शाळेमध्ये स्पर्धा होती. आणि विषय होता आवडता छंद या विषयामुळे प्रत्येक मुलाची अंगी असलेली कला, कौशल्य, ज्ञान याची ओळख होणार होती चिनुला खुप आनंद झाला त्याने त्या स्पर्धेत भाग घेतला आणि सुंदर चित्र, वेगवेगळ्या मूर्ती बनवून त्याने स्पर्धेत सहभाग नोंदवला काही दिवसांनी त्या स्पर्धेत निकाल आयोजित केला होता. आणि सुदैवाने त्यामध्ये चिनुला बक्षिस भेटले त्याने तयार केलेल्या मूर्ती प्रेक्षनिय तर होत्या त्याबरोबरच रेखाटलेली चित्र ही सुंदर होती.

त्यादिवशी चिनु भलताच खुश होता, घरी जाऊन आधी आजीला मिठी मारली आणि आजीला बक्षिस दाखवले. आजीला बक्षिस बघून भरून आले. आजीने आपल्या नातवाचे तोंडभरून कौतुक केले. चीनुसाठी खास तिने त्या दिवशी गोडाच जेवण बनवलं होत आजी-नातवाचा आनंद त्यादिवशी गगनात मावेना.

चिनुची हुशारी त्याच्या अंगी असलेले विविध गुण हे त्याच्या वर्गाशिक्षकांच्या तेव्हाच लक्षात आले. त्यांनी चिनुला त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळाला म्हणून चिनूला खुप प्रोत्साहन देते, त्याबरोबरच चिनुला आर्थिक जमेल तशी मदत त्यांनी केली. चिनू त्यांच्या वर्गशिक्षकांचा खुप आवडता हुशार, होतकरू, आणि आदर्श असा विद्यार्थी होता.

पुढे जाऊन चिनुने देखीळ खुप कष्ट, मेहनत करून आपल्या घरची परिस्थिती ती सांभाळून आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता तो एक आदर्श व्यक्ती गावासमोर बनला आहे. त्याने आपल्या कलेतून उत्तुंग भरारी घेतली आहे. आणि एक यशस्वी पुरुष बनून त्याने आपले स्थान निश्चित केले होते. तो आपल्या या घवघवीत यशामागे आपल्या प्रेमळ आजी त्यांचे आवडते शिक्षक यांचा खुप मोठा हात आहे असे मानतो. हलाकीच्या परिस्थितीतून देखील त्याने त्याचे यश संपादन केले. यामधून एवढा बोध आपण घेऊ शकतो की...

आयुष्य कितीही खडतर असो, मेहनतीने जिद्दीने आपण यश प्राप्त करू शकतो. आयुष्यात अशक्य असे काहीच नाही ते शक्य करण्याची हिंमत प्रत्येकात असण्याची गरज मात्र नितांत आहे.

- कै. दत्ताजी भाले प्रा. विद्यालय अंबड

सौ. नुतन वाबळे

(पालक)

Powered By Sangraha 9.0