लाखाची गोष्ट

07 Jun 2023 11:10:50


लाखाची गोष्ट

आकड्यांची भरली एकदा सभा

सगळ्यांना होती बोलायला मुभा

एक म्हणाला, दहा अंकात मीच पहिला,

तेव्हा... अध्यक्षाचा मान हवा मला

शहाणाच आहेस... दोन ओरडला

रागारागाने जायला निघाला

तीन बसून ठोकून मांडी

चाराने घातली पायाला आढी,

पाच हालवीत बसला सोंड,

सहाने फिरवले रागाने तोंड,

साताने घातली तोंडाला मिठी,

आठ आपटी आजोबांची काठी,

निषेध निषेध... सगळाच गोंधळ

सभेत उठले आकड्यांचे वादळ

त्यांच्यात होता शहाणा नऊ.. म्हणाला,

‌‘आपण सारे भाऊ भाऊ, नकाच भांडू शिस्तीने राहू'

एकावर पूज्य ठेऊन म्हणाला, दहा-हा लाखाची गोष्ट बोलला पहा

‌‘एकमेका मदत करू, चुकेल त्यांचे कान धरू,

कुणी नाही छोटे, कुणी नाही मोठे,

एकीचे बळ, ही ठाउक आहे ना गोष्ट?

आकड्यांना कळली आपली चुक

जागेवर जाऊन बसले गुपचुप

असते एकीची हीच गंमत

प्रत्येकांची लाख लाख किंमत

- गौरी काकडे, पालक

श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, अंबाजोगाई

Powered By Sangraha 9.0