राजर्षी शाहू महाराज

शिक्षण विवेक    12-Jul-2023
Total Views |


राजर्षी शाहू महाराज

पाच सहाच्या सुमारास

निघाले शाहू महाराज

व्यवस्था पाहत फिरत

व्यवस्था पाहत फिरत

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

घोडे कुत्री आणि बैल

बहिरी ससाणे अनेक

हत्ती माहुताला बोलावून

काहीतरी सूचना ते देत

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

मागे वळाले महाराज

मी होतो पंधरा फुटावर

त्यांची दृष्टी खिळली माझ्यावर

मी मुजरा केला आदरान

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

कोण रे तू झाली गर्जना

मी कृष्णा मातंग समाजाचा

शिकायची आहे मला शाळा

म्हणाले उद्या ये रे तू बाळा

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

दुसऱ्या दिवशी गेलो आवरून

शाळेत बसलो थोडा जाऊन

म्हणाले गुरुजी आवर्जून

मोठा हो तू खूप शिकून

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

जरा वेळाने आले निंबाळकर

गुरुकुलमध्ये न्या म्हणून

गोड आवाजाची आज्ञा मानून

गोड आवाजाची आज्ञा मानून

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

त्यांच्या लाडक्या संस्थेत

खर्च करा डेरीतून

करा मोठे मुलास शिकवून

करा मोठे मुलास शिकवून

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

मानवता एकची धर्म

शिकून करा तुम्ही पुढे कर्म

असंच एक गरीब पोरं

झाला की हो कृष्णा थोर

जीऽऽऽजीर जीऽऽऽजीर जीजीजी

- साधना प्रवीण फडणीस, शिक्षिका

कै.वा.दि.वैद्य मुलींची प्राथमिक शाळा