माझी शाळा

13 Jul 2023 15:30:09


माझी शाळा

प्रत्येक मुलाला चांगले घडविण्यात आई-बाबांप्रमाणे शाळेचाही तेवढाचा मोलाचा वाटा असतो.‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे' या उक्तीस श्री सिध्देश्वर विद्यालय सार्थ ठरत आहे. शाळेची भव्य इमारत आणि सुसज्य हवेशीर वर्गखोल्या अभ्यासास पोषक वातावरण शाळेकडे आम्हा मुलांना आकर्षित करते.

शाळेत खेळ, व्यायाम, यांना अभ्यासाबरोबर तितकेच महत्व दिले जाते. शाळेत मोठे क्रिडांगण आहे. ठिकठिकाणी झाडे आहेत. ज्यामुळे शाळेचे वातावरण अत्यंत रमणीय होते. विदयार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणारे ग्रंथालय, विज्ञानाशी जोडून ठेवण्यासाठी विज्ञानप्रदर्शन तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षा ही शाळेची गुण वैशिष्ट्ये आहेत.

शाळेतील शिक्षक हे विश्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देण्याचे काम करत असतात. शाळेच्या आणि विदयार्थ्याच्या यशामागे शिक्षकांचा मोठा वाटा आहे. शाळेमध्ये साजरे केले जाणारे वार्षिक स्नेहसंमेलन, विविध सण, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, तसेच थोर नेत्यांची जयंती अश्या विविध कार्यक्रमांमार्फत आयोजित केल्या गेलेल्या उपक्रमांतर्गत आभ्यासाबरोबरच इतर कलागुणांनावाव मिळण्याचे काम श्री.सिद्धेश्वर विद्यालयांतर्गत होत असते.

श्री. सिद्धेश्वर विद्यालय अभ्यासाबरोबरच एक आदर्श संस्कार केंद्र म्हणून शहरात प्रचलित आहे आणि मला मी या संस्कार केंद्राचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो.

                                                                                                समर्थराज शिंदे

 श्री. सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय, माजलगाव

Powered By Sangraha 9.0