गुलमोहर

14 Jul 2023 12:28:50


गुलमोहर

सोहळा सजला,

गुलमोहर बहरला.

लाल मखमली,

गालिचा अंथरला.

कल्पवृक्ष फुले ग्रीष्मात,

हर्ष भरे मनात.

रखरखत्या उन्हात,

उत्साह देई जनात.

उन्हाच्या झळा सोसून,

हसत उभा अंगणी.

फुले दिसतात शोभून,

जसे तारे नभांगणी.

मन वेडे रमते,

गुजगोष्टी आठवते.

निसर्गाचे रूप,

मनात साठवते.

वाटसरू येताजाता,

घेतो विसावा.

झाडालाही सर्वांचा,

आशीर्वाद असावा.

- अनुराधा लाहोरकर-खुरपे

श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय, माजलगाव.

Powered By Sangraha 9.0