मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच;

मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच;

शिक्षण विवेक    21-Jul-2023
Total Views |


मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच;मला किंडर जॉय हवं म्हणजे हवंच;

Dairy milk पाहिजेच..

असा बालहट्ट कुणाच्या घरी साजरा होत नाही? आपल्या सगळ्यांना तो किमान एकदा तरी पुरवावा लागला आहे किंवा लागत आहे. शक्यतो या सवयी मुलांना लागू नयेत, यासाठी अनेक पालक जागरूक आहेत. पण हे आता आपल्या घरात आलं, जाहिरातींमधून... आभासी विश्वातून प्रत्यक्षात आणि प्रत्यक्षातून परत आभासी विश्वात. या दिवसभरातल्या खेळांमधून बालमन पहिलं काही टिपत असेलच, तर आवडतं खाद्य. जाहिराती तर रोजच लागतात. चॉकलेट, गोळ्या, आइसक्रिम कसं रोज खाणार? परत आपला अभ्यास आणि सहनशक्तीचीही परीक्षा सुरू. याबरोबरच जाहिराती म्हणजे काय? त्या कशा असतात? त्यात वस्तूचं मूल्य अधिकाधिक प्रकारे पण कमीतकमी वेळात कसं दाखवलं जातं, हे रंजक पद्धतीनं मुलांना सांगावं. ‌‘अमूल दूध पिता है इंडिया' यातली चित्र, गाण्याच्या ओळी आवडतीलच, पण इंडिया ही कळेल. अशाच अनेक जाहिराती (जुन्यातल्या जुन्यादेखील) यूटयूबवर उपलब्ध आहेत. रंजकतेबरोबरच याचं अध्यासनमूल्य मला अधिक वाटतं.

कितीतरी Visuals, शब्द, चाली मुलं पाहतात. यातून काय पाहायचं हा choice मुलांचा तयार होतो. शांत, बडबडी, खेळकर या जशा मुलांच्या चित्तप्रवृत्ती, त्याचप्रमाणे मुलांचा genre (जनॉर) तयार होतो. म्हणजेच मुलं लहानपणापासूनच स्वतःची आवड ठेवून Passive पद्धतीनं माध्यमांना हाताळत नाहीत, तर Active पद्धतीनं आपापली आवड जोपासत टी.व्ही पाहतात, मोबाईलची ओळख करून घेतात. ‌‘स्वतःसाठी'

टी.व्ही.वरचं मोबाईलवर पण कसं दिसतं? सीरियल, रिआरिटी शोज, बातम्या म्हणजे काय? बातम्या देणारे कोण असतात? वृत्तपत्र फाडू नको, त्यावर रेघोट्या मारू नको हे सांगण्यापूर्वी त्याचं माहितीमूल्य रोजच्या जगण्याशी कशा प्रकारे बांधलं गेलं आहे, हे पण सांगू या. अगदी सोप्यासोप्या पद्धतीनं वृत्तपत्रातली चित्रं दाखवायची, माहिती सांगायची, ‌‘लहान मुलांचं पान' दाखवायचं ते समजायला अवघड नाही. टी.व्ही.वरच्या बातम्या पाहताना किमान पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यापासून सुरुवात करताना हे सगळं मोबाईलवरही (वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातम्या) आपण कसं पाहू शकतो हे सांगणं मजेशीर आहे.

मजेशीर यासाठी की, जेवढ्या कल्पकतेने आपण हे सांगत राहू तेवढीच माहिती घेण्याची उत्कंठा वाढवणारे हे वय आहे आणि माहिती घेणं हा पाया भक्कम झाला की, मनोरंजनाचं पुढचं पाऊल मुलं आत्मविश्वासाने, सक्षमपणे, डोळस वृत्तीनं टाकणार आहेत.

त्यांची कल्पकता, सर्जनशीलता वाढवणारं हे कोमल वय माध्यमांची जादूची कांडी हातात घेऊनच फिरत आहे. त्याचा कसा उपयोग व्हावा? आपण ठरवू.. ज्यादिवशी मला हे पाहायचं नाही, हे पाहायला आवडेल तो श्रीगणेशा..

जाता जाता सहजच

‌‘काय गं त्याचं नाव?' मी पुन्हा विचारलं.

‌‘दीप... दीपऽऽ आई - मंगलदीप मधला दीपऽऽ'

या अगरबत्तीची जाहिरात तिला अनेकदा आवडली- इथे आठवली मला हेच महत्त्वाचं वाटतं. तुम्हाला?

 

- अमृता धायरकर