फार काही नको मला
हव्यात फक्त खूप मैत्रिणी मला
फार काही नको मला ॥
हवी आहे फक्त शुद्ध हवा
त्यामुळे सगळे राहतील आरोग्यदायी
फार काही नको मला ॥
हवी आहे फक्त सज्जनांची संगत
चांगल्या गोष्टी शिकायला
फार काही नको मला ॥
सगळेच राहो आरोग्यदायी
एवढंच हवं आहे मला
फार काही नको मला ॥
- कु. शर्वरी येणपुरे
6वी, शिवनेरी
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला