पावसाची मजा

31 Jul 2023 14:44:35

पावसाची मजा
 
संध्याकाळी छान वेळ,
सुरू होतो आमचा खेळ.
सोसाट्याचा सुटला वारा,
खेळात व्यत्यय झाला सारा.
गडगडाट झाला ढगांचा,
घाबरला जीव मुलांचा.
विजेने केला कडकडाट,
सगळे बघती पावसाची वाट.
पाऊस कोसळला खूप जोरात,
खेळ सोडून पळालो घरात.
पावसाचे पाणी वाहे खळखळ,
लोकांची होते मस्त पळापळ.
छत्री घेऊन दिसले आजोबा,
चिखल बघता म्हणाले, ‘काय हे बाबा!’
पावसात येते मजा भारी,
भिजलो तर मात्र रागवतात घरी.
- तनुजा बेहरे, 9वी,
महिलाश्रम हायस्कूल कर्वेनगर, पुणे
Powered By Sangraha 9.0