प्रस्तावना : माझ्या आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गाडीने सिंहगडावर गेलो. बघू या काय झाले तिकडे?
मी : आई, केवढा मोठा आहे हा दरवाजा...
आई : हो. असे म्हणतात की, हा अनेक हत्ती जातील एवढा मोठा आहे.
मी : होऽऽहोऽऽ मी पुढे जाणार, तेवढ्यात मला आवाज आला.
दरवाजा : थांब! थांब!!
मी : कोण बोलतंय?
दरवाजा : मी दिंडी दरवाजा बोलतोय.
मी : दिंडी दरवाजा?
दरवाजा : तुला माहीत आहे का याचे नाव, ‘सिंहगड' असे का ठेवले गेले?
मी : नाही, माहीत मला.
दरवाजा : मी तुला सांगतो, एकदा शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याचे म्हणजेच तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न ठरले होते. पण शिवाजी महाराजांची युद्ध मोहीम समोर येऊन उभी ठाकली होती. त्याबद्दल त्यांनी तानाजी रावांना सांगितले. तेव्हा तानाजीराव जोषात म्हणाले, ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे.'
मी : मग कोंढाणा म्हणजे काय?
दरवाजा : कोंढाणा म्हणजे मीच!
मी : अस्सं होयऽऽऽ! पण तुम्ही तर...
दरवाजा : कळेल! कळेल! असे म्हणत ते निघाले. राजे नाही नाही म्हणत होते, पण ते कुठले ऐकतायत. रात्रीची वेळ होती. किट्ट अंधार होता. ते दोरीने गड चढू लागले. सूर्याजी (तानाजीचे बंधू) यांनी पुढच्या दरवाज्याने हल्ला केला उदयभान वरती. भयानक युद्ध सुरू झाले. तानाजीराव विजेसारखे कोसळत होते शत्रुंवरती. तेवढ्यात त्यांचा हात कापला गेला.
मी : अरेरे! हात कापला! पण कोणी?
दरवाजा : उदयभानानेच! पण तरीही ते लढायचे थांबत नव्हते. करता करता मुघल कमी होत होते आणि सूर्याजीही खूप लढत होते आणि उदयभानाने एक घाव जोरात तानाजींच्या छातीवरती केला; तसेच त्यानेही उदयभानांच्या छातीवरती घाव केला. दोघेही एकसाथ धारातीर्थी पडले. नंतर जेव्हा सूर्याजींनी गड जिंकला, हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळले, तेव्हा ते कोंढाण्यावरती आले. तेव्हा त्यांचे पहिले वाक्य होते, ‘गड आला, पण सिंह गेला' म्हणून त्याचे नाव सिंहगड ठेवले गेले.
मी : असं होय! (मी पुढे निघाले. तानाजींची समाधी बघण्यासाठी. तेवढ्यात मला आवाज आला.)
समाधी : थांब थांब!
मी : स्वत: तानाजी मालुसरे बोलत आहेत?
समाधी : हो, हो, मीच बोलतोय.
मी : मला एक प्रश्न पडलाय की आपण शिवाजी महाराजांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती का दिलीत?
समाधी : अगं, महाराजांनी जी स्वराज्यासाठी शपथ घेतली होती, ती आमच्या सोबतच! मग ती आम्ही पण घेतल्यासारखीच आहे ना?
हे उत्तर ऐकून मला खूप गहिवरून आले. आम्ही बाकीचा गड चढला आणि परतत असताना मला दिंडी दरवाजा म्हणाला आता सज्जनगडावर जा, तिथे तुझ्याशी कदाचित रामदास स्वामी बोलतील.
जय भवानी! जय शिवाजी!
मी गाडीतून येताना सज्जनगडावर जायचेच असा निश्चय करून आणि तसे आई-बाबांना सांगूनच घरात पाऊल ठेवले.
- शाल्मली करंबेळकर, 6 वी,
डी.इ.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे